खेलो इंडिया स्पर्धेत नाशिकच्या मुकुंद आहेरला सुवर्णपदक | पुढारी

खेलो इंडिया स्पर्धेत नाशिकच्या मुकुंद आहेरला सुवर्णपदक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा 

पंचकुला हरियाणा येथे सुरु असलेल्या चौथ्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत 55 किलो वजनी गटात नाशिक जिल्ह्यातील खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने सुवर्णपदक पटकावले आहे.

मुकुंद याने (वेटलिफ्टिंगमध्ये) स्नॅच मध्ये 99 किलो व क्लिन जर्क मध्ये 121 किलो असे एकूण 220 किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेत प्रशिक्षण घेत असलेल्या मुकुंदने खेलो इंडिया स्पर्धेत मिळवलेल्या या यशानंतर त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मुकुंदला मार्गदर्शन मिळाले.

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका  पोतदार एस. एस यांनी त्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

Back to top button