904 बालके कुपोषणमुक्त; पाच महिन्यांत कुपोषणाचे प्रमाण घटले | पुढारी

904 बालके कुपोषणमुक्त; पाच महिन्यांत कुपोषणाचे प्रमाण घटले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील 904 बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. जानेवारी ते मे महिन्यांतील अहवालानुसार सकस आहार आणि योग्य औषधोपचाराचा फायदा झाला असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी खास मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत कुपोषित बालकांचा शोध घेणे, कुपोषणाची कारणे शोधणे, या बालकांना सकस आहार देणे आणि योग्य औषधोपचार करता यावेत, यासाठी गाव पातळीवर ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करणे आदी कामे करण्यात येत आहेत. कुपोषित बालकांना या केंद्रात दाखल करून कूपोषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील बालकांना कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसला होता. जुलै 2021 मध्ये कुपोषित बालकांची संख्या केवळ 660 इतकी होती. जानेवारी 2022 मध्ये एकूण कुपोषित बालकांमध्ये 404 बालके ही अतितीव्र कुपोषित (सॅम) तर, 1 हजार 692 बालके ही तीव्र कुपोषित (मॅम) होती, असे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते.

दागिने चोरणार्‍या महिलांना अटक; दत्तवाडी पोलिसांची कामगिरी

कुपोषणमुक्त बालकांची तालुकानिहाय आकडेवारी

आंबेगाव 88
बारामती 91
भोर 67
दौंड 09
हवेली 47
इंदापूर 95
जुन्नर 125
खेड 163
मावळ 85
मुळशी 53
पुरंदर 18
शिरूर 50
वेल्हे 13
एकूण 904

बालकांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. यामधील काही बालकांना औंध येथील पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने जानेवारी 2022 मध्ये करण्यात आलेल्या तपासणीत कुपोषित आढळून आलेल्या बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले. यामुळे सुमारे 70 टक्के बालकांना कुपोषणमुक्त करण्यात यश आले आहे.

                – जे. बी गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण, जि. प.

Back to top button