Aurangabad Accident : क्रेनच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार; दाेघे गंभीर जखमी | पुढारी

Aurangabad Accident : क्रेनच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार; दाेघे गंभीर जखमी

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : भरधाव क्रेनने दुचाकीला जोराची धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात दोघा सख्या भावांपैकी लहान भाऊ जागीच ठार झाला. मोठ्या भावासह अन्य एकजण  गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना औरंगाबाद  (Aurangabad Accident) बीड बायपास  सहारा सिटीजवळ रविवारी (ता.१७) घडली. वैजीनाथ तातेराव नागरे (वय ३०) रा. काद्राबाद ता.औरंगाबाद असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर शिवाजी तातेराव नागरे ( वय ३६) आणि नामदेव सुदाम गायकवाड (वय ४२) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय  रुग्णालय घाटीत उपचार सुरू असून, त्‍यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Aurangabad Accident : दोघा भावांपैकी एक ठार

या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी काद्राबाद ता.औरंगाबाद येथील वैजीनाथ नागरे,  शिवाजी  नागरे आणि नामदेव  गायकवाड हे गवंडी काम करण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन काद्राबादहून औरंगाबादकडे येत होते. बीड बायपासवरील सहारा सिटीसमोर येताच त्यांच्या दुचाकीला भरधाव  क्रेन क्रमांक एम.एच.२० एफ.जी.३८१४ ने जोराची  धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील  वैजीनाथ नागरे हा जागीच ठार झाला. त्याचा मोठा भाऊ शिवाजी नागरे व नामदेव गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी या दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली. चिकलठाणा पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत दोघा जखमींना खासगी वाहनातून घाटीत उपचारार्थ दाखल केले.तपास चिकलठाणा पोलिस तपास करत आहेत.

अन चिमुकल्यांच्या डोक्यावरील वडीलांचे छत्र हरवले

अपघातातील दोघा भावापैकी लहान वैजीनाथ नागरे याचा जागीच मृत्यू झाला. तर  मोठा भाऊ शिवाजी नागरे हा गंभीर जखमी झाला आहे. अगोदरच घरातील परिस्थिती बेताची होती. मिळेल नागरे बंधू  गवंडी काम करुन कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळत होते. मयत  वैजीनाथ नागरे याच्‍या पश्‍चात आई, पत्नी, ८ आणि ५ वर्षांची  मुलगी, सहा महिन्याचा मुलगा आहे. या लहान मुलांच्या  डोक्यावरील वडीलांचे छत्र हरवल्याने संपूर्ण गावात  शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button