

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनची राजधानी कीव्हजवळ इमारतीला धडकून हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातातयुक्रेनच्या गृहमंत्र्यांसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर लहान मुलांच्या शाळेजवळ कोसळले. ही घटना कीव्हच्या ईशान्येकडील ब्रोव्हरी शहरात घडली. यामध्ये 10 मुलांसह 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टरमध्ये एकूण ९ जण होते. युक्रेनचे पोलिस प्रमुख इहोर क्लेमेंको यांनी सांगितले की, या दुर्घटनेत युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की, येवरेन येसेनिन आणि राज्य सचिव युरी लुबकोविक यांचा समावेश आहे. कीव्हचे राज्यपाल ओलेक्सी कुलेबा यांनी या अपघातात 10 मुलांसह 22 जण जखमी झाले असल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे.