Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा सुरु, युक्रेन मुद्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार

Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा सुरु, युक्रेन मुद्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे गुरुवारी सकाळी गुजरातमधील अहमदाबाद येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली.

शुक्रवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा करतील. त्यांचा हा दौरा इंडो-पॅसिफिकवर क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यावर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारताची रशियाकडून सवलतीच्या दरात तेलाची खरेदी आणि UN मध्ये भारताचा मतदानाचा पॅटर्न, यावर विचारले असताना लंडनमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान जॉन्सन यांचा भारत दौरा हा रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाही.
हा दौरा बऱ्याच दिवसांपूर्वीच नियोजित होता. भारत हा अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि संरक्षण आणि हरित ऊर्जा या सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या जॉन्सन यांच्या दौऱ्यात या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

"आम्ही भारताला सल्ला देण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणून रचनात्मकपणे काम करणार आहोत." असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

भारत आणि ब्रिटनने मुक्त व्यापार करारासाठी चर्चेच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि शुक्रवारी होणाऱ्या चर्चेमुळे सुरू असलेल्या वाटाघाटींना आणखी प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.

जॉन्सन (Boris Johnson) गुरुवारी गुजरातमधील विद्यापीठ आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात करत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ब्रिटन आणि भारत दरम्यान सॉफ्टवेअर अभियांत्रिकीपासून आरोग्यापर्यंतच्या क्षेत्रात १ अब्ज पाउंड पेक्षा जास्त नवीन गुंतवणूक आणि निर्यातीसाठी डील होणार आहे. यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये जवळपास ११ हजार नोकऱ्या निर्माण होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news