मोदी सरकारने संपूर्ण देशच उद्योगपतींना विकला : संजय राऊत | पुढारी

मोदी सरकारने संपूर्ण देशच उद्योगपतींना विकला : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेक्स : “केंद्र सरकारने संपूर्ण देशच उद्योगपतींना विकला आहे. देश विकून मिळवलेला पैसा कुठे गेला? एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे. राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा वाटतं तितकं सोपं प्रकरण नाही, आम्ही पुराव्यानिशी बोलतो. पोलीस योग्य दिशेने तपास करीत आहेत”, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांना दिली.

पत्रकार परिषदेत  संजय राऊत म्हणाले की, “बदल्या आणि बढत्या हा गृहखात्याचा अंतर्गत विषय आहे. १२ तासांत ५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीची तयारी आजपासून सुरू आहे. नागपूरमध्ये पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजेत. आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यात जाणार आहेत. मुख्यमंत्रीही त्यात लक्ष घालत आहेत.”

 

Back to top button