देशात कोरोना पुन्हा वाढू लागला! २४ तासांत २,३८० नवे रुग्ण, ५६ मृत्यू | पुढारी

देशात कोरोना पुन्हा वाढू लागला! २४ तासांत २,३८० नवे रुग्ण, ५६ मृत्यू

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,३८० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १३,४३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. २४ तासांत १,२३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

याआधीच्या दिवशीही देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली होती. एका दिवसात दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ६६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. बुधवारी २ हजार ६७ रुग्णांची भर पडली होती. तर, ४० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान १ हजार ५४७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.४९ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८७ कोटी ७ लाख ८ हजार १११ डोस देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत २ कोटी ५७ लाख ८० हजार ५३ बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी २७ लाख २३ हजार ६२५ डोस पैकी २० कोटी ३३ लाख ७५ हजार ९० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३ कोटी २९ लाख २७ हजार ९३८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख २१ हजार १८३ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

देशातील बूस्टर डोसची स्थिती

श्रेणी बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी ४६,३०,४०५
२) फ्रंटलाईन वर्कर्स ७२,०३,५७३
३) १८ ते ४४ वयोगट ४६,९६०
४) ४५ ते ५९ वयोगट १,६४,०४०
५) ६० वर्षांहून अधिक १,३७,३५,०७५

Back to top button