

पुढारी ऑनलाईन डेस्क : बऱ्याच विद्यार्थ्यांना नेट परीक्षा देऊन शिक्षक बनण्याची इच्छा असते. त्यापैकी तुम्ही एक आहात का? यासाठी नेट परीक्षा दिली आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा 'नेट' (NET-National Eligibility Test ) २०२३ डिसेंबर महिन्यात झाली. तर या परिक्षेचा निकाल आज (दि.१७) लागणार आहे. या बातमीत आपण निकाल कुठे, कसा पाहायचा इत्यादी सर्व तपशीलवार माहिती पाहू. UGC NET 2023
युजीसी नेट डिसेंबर परीक्षेचा निकाल आज (दि.१७) जाहीर होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ६ डिसेंबर २०२३ ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत ९,४५,९१८ उमेदवारांसाठी देशभरातील २९२ शहरांमध्ये ८३ विषयांसाठी UGC – NET डिसेंबर २०२३ आयोजित केली होती. जर तुम्हाला या परिक्षेसंबधित अधिक आणि अधिकृत माहिती हवी असेल तर तुम्ही युजीसीच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही हेल्प डेस्क क्रमांक ०११-४०७५९००० / ०११-६९२२७७०० वर कॉल करू शकता आणि माहिती घेवू शकता.
हेही वाचा