

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, त्यातील 37 ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत.10 ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे रविवारी 184 ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजोपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत 2 हजार 42 ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होत असून, त्यातील 851 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. 59 जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे आज 1 हजार 132 सदस्यांसाठी मतदान होणार आहे.
सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून, उमेदवारी अर्ज माघारीनंतर 851 सदस्यांच्या जागा बिनविरोध निघाल्या. त्यामुळे त्यक्षात 1 हजार 132 जागांसाठीच मतदान होणार आहे, तर 37 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सरपंच थेट मतदारांतून निवडला जात असून, तीन ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज आलेला नाही. तर उमेदवारी अर्ज माघारीनंतर 49 सरपंच बिनविरोध निघाले. त्यामुळे प्रत्यक्षात 179 सरपंचपदांसाठी मतदान होणार आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच 124 ग्रामपंचायतीमधील 204 सदस्य, तर 7 सरपंचपदांसाठीही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 204 सदस्यपदांपैकी 106 ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 63 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. प्रत्यक्ष मतदान 35 सदस्यांसाठी होणार आहे. रिक्त असलेल्या सात सरपंचपदांपैकी तीन ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. दोन जागा बिनविरोध निघाल्या असून, दोन जागांसाठी मतदान होणार आहे.
आंबेगाव – 184, खेड – 24, इंदापूर – 6, पुरंदर – 12, हवेली – 3, भोर -13, मावळ – 14, बारामती – 31, शिरूर – 8, वेल्हे – 6, जुन्नर -20, दौंड – 10 आणि मुळशी – 18
हेही वाचा