

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी रविवारी (दि.१८) पाणबुडीने उत्तर अटलांटिक महासागराच्या खोलवर गेलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता झालेली ही पाणबुडी सापडली असून पाणबुडीचा स्फोट होऊन त्या पाचही जणांचा मृत्यू झाला. याबाबत यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी. जॉन मॅगर यांनी गुरुवारी (दि.२२) माहिती दिली. हे पाचही अब्जाधीश ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या पाणबुडीमधून गेले होते. (Titanic submersible updates)
माहितीनूसार,ओशियन गेटच्या पाणबुडीतून एकूण ५ पर्यटक रविवारी (दि.१८) टायटॅनिक जहाज (Titanic tourist submarine) पहायला गेलेले होते. सोमवारी (दि. १९) ही पाणबुडी पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली. तटरक्षक दल या पाणबुडीचा शोध घेत होते. तब्बल चार दिवस होऊनही ही पाणबुडी अद्याप सापडलेली नाही. तसेच याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. मात्र गुरुवारी सकाळी (दि.२२) बेपत्ता जहाजाबाबत एक मोठी माहिती समोर आली. या पाणबुडीतील ऑक्सिजनचा (Oxygen storage in a submarine) साठा संपला आहे. टायटॅनिक जहाजाजवळ बेपत्ता पाणबुडीचे काही अवशेष सापडलेले आहेत. त्यानंतर यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी. जॉन मॅगर यांनी गुरुवारी (दि.२२) सांगितले की, या पाचही अब्जाधीशांचा मृत्यू झाला आहे. (Titanic submersible updates )
पाणबुडीतील दुर्दैवी पाचजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग (वय ५८), पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा (वय १९) यांचा समावेश आहे. याचबरोबर एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट यांचा समावेश आहे.
टायटॅनिक जहाजाचे बुडालेले अवशेष दाखवण्यासाठी गेलेल्या पाणबुडीची जबाबदारी पोलर प्रिन्स नावाच्या जहाजाने घेतली आहे. पोलर प्रिन्स जहाजाने टायटन पाणबुडीला (Titan submarine) उत्तर अटलांटिक महासागरात नेले. यानंतर टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचल्यावर पाणबुडी पाण्यात उतरवली जाते. या पाणबुडीत एकावेळी फक्त चार ते पाच प्रवासी बसतात. यानंतर, पाणबुडी 4000 मीटर खोलीवर पडलेल्या टायटॅनिकच्या अवशेषासाठी रवाना झाली. पोलर प्रिन्स जहाज टायटन पाणबुडीच्या संपूर्ण प्रवासासाठी कमांड आणि कंट्रोल स्टेशन म्हणून काम करते.
हेही वाचा