Pm Modi Us Visit : पंतप्रधानांच्या शाही मेजवानीत भरड धान्य केक, मशरूम अन् बरेच काही!

Pm Modi Us Visit : पंतप्रधानांच्या शाही मेजवानीत भरड धान्य केक, मशरूम अन् बरेच काही!
Published on
Updated on

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi Us Visit) यांच्या आगमनाने व्हाईट हाऊसमध्ये चैतन्य संचारले आहे. यजमान बायडेन दाम्पत्य आपल्या या खास पाहुण्यांसाठी झटत आहेत. बायडेन दाम्पत्याच्या वतीने मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित शाही मेजवानीत पंतप्रधानांच्या आवडी-निवडींची दखल घेत अत्यंत चोखंदळपणे पदार्थांची निवड करण्यात आली आहे.

फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी या मेजवानीच्या आयोजनात विशेष लक्ष घालत सर्व तयारी केली आहे. मोदी यांची आवड ध्यानात घेऊन एक एक पदार्थ निवडण्यात आला आहे. ते बनवण्यासाठी निष्णात शेफमधील दोन खास शेफवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. या
मेजवानीआधी जिल बायडेन यांनी पत्रकारांना तयारीचे दर्शन घडवले व माहिती दिली.

व्हाईट हाऊसच्या दक्षिणेकडील लॉनवर ही शाही मेजवानी होणार असून त्याला अत्यंत निवडक अशा फक्त 400 जणांची उपस्थिती राहणार आहे.

खास मोदींसाठी

या मेजवानीच्या केंद्रस्थानी पंतप्रधान मोदी असल्याने त्यांच्यासाठी खास वाफवलेली आणि मॅरिनेट केलेली भरड धान्ये, मक्याच्या दाण्यांचे विशेष सॅलड, भरलेले मशरूम, टरबुजांच्या फोडी, आंबट तिखट चवीचे अ‍ॅव्हॅकाडो सॉस असणार आहे. भरली मशरूम बनवण्यासाठी खास इटालियन पोर्टबेलो मशरूम निवडण्यात आले आहेत. या मेजवानीचे रूप हे भारतीय-अमेरिकन असे दुहेरी राहणार आहे. केशरमिश्रित रिसोटो त्यात आकर्षण असणार आहे. भारताने भरड धान्याच्या प्रचार आणि प्रसाराची मोहीम हाती घेतली असून ते ध्यानात घेत खास भरड धान्याचा केक आणि वाफवून मॅरिनेट केलेली भरड धान्येही प्लेटमध्ये शोभा वाढवणार आहेत.

दोन शेफची कामगिरी (Pm Modi Us Visit)

व्हाईट हाऊसच्या कार्यकारी शेफ क्रिस्टेटा कम्फर्ड आणि खास पाचारण करण्यात आलेल्या जगविख्यात शेफ नीना कर्टिस यांनी हा सारा मेन्यू तयार करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. नीना कर्टिस म्हणाल्या की, फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना स्वतःला आवड असल्याने मेन्यू निवडताना त्यांचे विचार व नवीन माहिती मिळाली. त्यांच्यासोबत काम करताना आनंद वाटला. भारताच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जात असताना त्यांचा मेन्यूत समावेश करण्याचे आव्हान मोठे होते. ते आम्ही पेलले आहे, असे आम्हाला वाटते. भारतीय आणि अमेरिकन खाद्यसंस्कृतीचा संगम दाखवणारा हा मेन्यू सर्वांना आवडावा हीच प्रार्थना असल्याचेही कर्टिस म्हणाल्या.

शाही शामियाना आणि मोर ही थीम

व्हाईट हाऊसच्या दक्षिणेकडील लॉनवर या मेजवानीसाठी शाही शामियाना उभारण्यात आला असून त्याची सजावट करताना खास मोर ही थीम राबवण्यात आली आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असल्याने ते ध्यानात घेऊन मोराच्या रंगांची थीम करून तशी सजावट करण्यात आली आहे. तसेच या मेजवानीसाठी व्हाईट हाऊसच्या संग्रहातील खास शाही कटलरी वापरण्यात येणार आहे.

बास मासे आणि विविध वाईनही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण शाकाहारी असले तरी इतरांच्याही आवडींची दखल घेत समुद्रातील बास मासे, काही मांसाहारी पदार्थ मेजवानीत ठेवण्यात आले आहेत. याशिवाय या मेजवानीतील वाईनच्या यादीत स्टोन टॉवर शॅर्डोनेची क्रिस्टी 2021, पटेल रेड ब्लेंड 2019, डोमेन कॅर्नेरोस ब्रूट रोझ आदी शाही वाईन्सचा समावेश आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news