Tiger Count : पट्टेरी वाघांची संख्या वाढली; देशात 3800 तर महाराष्ट्रात 375 वाघांचा संचार

File Photo
File Photo
Published on
Updated on

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : Tiger Count : भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या व्याघ्रगणनेच्या निकषाप्रमाणे झालेल्या गणतीमध्ये भारतात 3800 वाघ सापडले आहेत. मागच्या वर्षी ही संख्या 3700 होती. सर्वाधिक वाघ कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये असल्याचेही या पाहणीत पुढे आले आहे. राज्यात एकूण 375 वाघांची नोंद झाली आहे. 9 एप्रिलला याबाबतचा अधिकृत अहवाल जाहीर होणार आहे.

प्रोजेक्ट टायगर Tiger Count या मोहिमेला 50 वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात काही नवे उपक्रम हाती घेतले जात आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला लागून असलेल्या सह्याद्री पट्ट्यात पाच पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. यात चंदेली अभयारण्य, भैरवगड, रांजणगड आणि दाजीपूर या सह्याद्रीच्या टापूंचा समावेश आहे. सध्या वाणांची स्थिती तेथे आढळणार्‍या वनस्पती, वृक्ष, जलचर, उभयचर प्राणी-पक्षी आदी माहितीचा संचय यात करण्यात आला आहे.

मागील तीन वर्षांपूर्वीच्या अहवालात देशभरांची वाघांची संख्या 2950 Tiger Count होती. यात आत मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशातील 22 राज्यातील जंगलांमध्ये व्याघ्र गणना करण्यात आली आहे. सध्या सर्वाधिक वाघ कर्नाटकात, तर त्याखालोखाल कर्नाटक मध्ये 600 तर मध्य प्रदेशात 550 वाघांची नोंद आहे. तर महाराष्ट्रात चंद्रपूरसह मेळघाट, बोर, नवे गाव, नागझिरा, पेंच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ताडोबा या वाघांच्या प्रदेशात 375 पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. जवळजवळ 7 पट्टेरी वाघांचा अपघाती आणि परस्पर झुंजीत मृत्यू झाल्यानंतरही वाघांच्या संख्येत चांगली वाढ होत असल्याने व्याघ्र संरक्षणासाठी राबवलेली उपाययोजनांना सलग तिसर्‍या वर्षी चांगले यश आले आहे.

Tiger Count : चित्त्याच्या वाढीवरही लक्ष

भारतात आफ्रिकन चित्ते नुकतेच आणण्यात आले. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. मात्र यातील चित्ते संरक्षित जंगलातून बाहेर लोकवस्तीजवळ गेल्याने सप्टेंबरमध्ये नामिबीयातून आणलेल्या या चित्यांच्या संरक्षणासाठी नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बाहेर गेलेला एक चित्ता पुन्हा कुनो राष्ट्रीय उद्यानातील मुक्तसंचार क्षेत्रात सोडला जाणार आहे.

Tiger Count : नव्या निकषाने व्याघ्रगणना

2006 पासून, नव्या निकषाने व्याघ्र गणना होत आहे. यामध्ये कॅमेरा टॅपिंग, पाणवठ्यावरील प्रत्यक्ष पाहणी आणि पाऊलखुणा अशा तीन पद्धतींच्या व्याघ्र गणनेत वन्यजीव संस्थेने नव्या नोंदींचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात भारतातील पट्टेरी वाघांची संख्या 3800 पर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news