

श्रीनगर ; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने धडक कारवाई केली. पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत ( Pulwama encounter) जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एक पाकिस्तानचा नागरिक आहे. परिसरात शोध मोहिम राबविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुलवामामधील चांदगाम परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर विभागाने सुरक्षा दलास दिली. सुरक्षा दलाने परिसरास वेढा दिला. शोधमोहिम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या वेळी सुरक्षा दलाने केलेल्या धडक कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. यातील एक पाकिस्तानचा नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुरक्षा दलाने मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दोघेही लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते. डिसेंबर २०२१मध्ये सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत २९ दहशतवादी ठार झाले. यातील सात जण पाकिस्तानमधील होते. मागील पाच दिवसांत झालेल्या चकमकीत १४ दहशतवादी ठार झाले आहेत. यातील चार जण पाकिस्तानमधील असल्याचेही सुरक्षा दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
हेही वाचलं का?