तुळजापूरला दर्शनासाठी जाताना भाविकांच्या गाडीला अपघात; ३ ठार
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर देवीचे दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या बोलेरोचे टायर अचानक फुटून झालेल्या अपघातात तीन जण ठार, तीन जण जखमी झाले. मरण पावलेले भाविक हो सिन्नर येथील आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सोलापूर- तुळजापूर मार्गावरील तामलवाडी परिसरात ही दुर्घटना घडली.
या वाहनात सिन्नर तालुक्यातील चारनकावाडी आणि तासगाव येथील भाविक होते. मरण पावलेल्यांत निखिल सानप (24), अनिकेत भाबड ( 24), शाम खैरनार (26) यांचा समावेश आहे जखमी झालेल्या भाविकांमध्ये जीवन ढाकणे (24) जीवन बबन बिडगर (26), तुषार दत्तात्रय बिडगर (27) यांचा समावेश आहे. सर्व जखमी सिन्नर तालुक्यातील तासगावचे रहिवासी आहेत. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सही भुरे पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून जखमींना सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचलंत का ?

