

पुणे, पुढारी वृत्तसेवा: टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.20) दुपारी चार वाजताच्या सुमारास कात्रज फाटा परिसरात घडली. कैलास दत्तु मळेकर (वय. 40, रा. नेताजी मंदीर, कात्रज) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कैलास यांची पत्नी संगीता मळेकर यांनी फिर्याद दिली आहे. कैलास हे मोपेड दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी टेम्पो चालकाने कैलास यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.