सातारा: पिस्टल ठेवताना मॉलमधील कामगाराच्या कंबरेत गोळी घुसली | पुढारी

सातारा: पिस्टल ठेवताना मॉलमधील कामगाराच्या कंबरेत गोळी घुसली

सातारा: पुढारी वृत्तसेवा : शेंद्रे (ता. सातारा) येथे मॉलमध्ये एकाची पिस्टल पडल्यानंतर ती ठेवत असताना फायर झाला. फायर झालेली गोळी कामगाराच्या कंबरेत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला . आज (दि.२१) दुपारी झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .

दोन दिवसांपूर्वी फायरिंगने पाटण तालुका हादरला आहे. अशातच सातारा तालुक्यातही फायरची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार पिस्टलधारी व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असून पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकी ही घटना कशी घडली? पिस्टल परवाना आहे का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा 

Back to top button