IND vs AUS T20I : सुमार गोलंदाजीला गचाळ क्षेत्ररक्षणाची जोड… ‘ही’ आहेत भारताच्‍या पराभवाची कारणे

IND vs AUS T20I : सुमार गोलंदाजीला गचाळ क्षेत्ररक्षणाची जोड… ‘ही’ आहेत भारताच्‍या पराभवाची कारणे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्‍या तीन टी-20 सामन्यांची मालिकेतील पहिल्‍या सामना मंगळवारी झाला. या सामन्‍यात भारताचा ४ विकेटने पराभव झाला. २०८ धावा करुनही टीम इंडिया पराभूत झाली. जाणून घेवूया पहिल्‍या टी-20 सामन्‍यातील पराभवाची प्रमुख कारणे…

IND vs AUS T20I : स्‍टार फलंदाज ठरले अपयशी

मोहाली मैदानावरील खेळपट्‍टी फलंदाजांना अनकूल होती. तरीही भारताचे तीन स्‍टार फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार रोहित शर्माने ९ चेंडूत केवळ ११ धावा केल्‍या. तर विराट कोहलीने ७ चेंडूत २ धावा केल्‍या. दिनेश कार्तिककडून दमदार कामगिरीची अपेक्षा असताना त्‍यानेही ५ चेंडूत ६ धावा करत चाहत्‍यांची निराशाच केली. या तीन स्‍टार फलंदाजीने २१ चेंडूत केवळ १९ धावा केल्‍या.

गचाळ क्षेत्ररक्षण, तीन झेल सोडले

'
'कॅचेस विन मॅचेस' अशी म्हण क्रिकेटमध्ये प्रचलित आहे. या सामन्‍यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्‍यंत सुमार झाले. कॅमेरुन ग्रीन ४२ धावांवर खेळत असताना अक्षर पटेल याने त्‍याचा झेल सोडला. यानंतर केएल राहुल याने १९ धावांवर खेळणार्‍या स्‍टीव्‍ह स्‍मिथच झेल सोडला. यानंतर स्‍मिथ याने २४ धावांत ३५ धावा केल्‍या. हर्षल पटेल याने आपल्‍या गोलंदाजीवर २३ धावांवर खेळणार्‍या मैथ्‍यू वेडचा झेल टाकला. हाच मैथ्‍यू ४५ धावा करत नाबाद राहिला. भारताच्‍या क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे ऑस्‍ट्रेलियाचा विजय सुकर झाला.

अक्षर पटेल सोडले तर सर्व गोलंदाज ठरले फ्‍लॉप

या सामन्‍यात भारताच्‍या गोलंदाजांनीही निराक्षा केली. कर्णधार रोहित शर्माने सहा गोलंदाजांना संधी दिली. यामध्‍ये अक्षर पटेल वगळता अन्‍य गोलंदाज आपल्‍या नावाला सोजेशी कामगिरी करु शकले नाहीत. भुनवेश्‍वर कुमारने ४ षटकात ५२ धावा दिल्‍या. तर उमेश यादव सर्वात महागडा ठरला. त्‍याने दोन षटकांमध्‍ये २७ धावा दिल्‍या. युजेवेंद्र चहल याने ३.२ षटकांमध्‍ये ४२ तर हर्षल पटेल याने प्रति षटक १२.२५ आणि हार्दिक पंड्याने चार चषकांमध्‍ये ४४ धावा दिल्‍या. गोलंदाजांची सुमार कामगिरीमुळे ऑस्‍ट्रेलिया माेठ्या धावसंख्‍येचे आव्‍हान पेलू शकले.

शेवटच्‍या षटकांमध्‍ये खराब गोलंदाजी

१६ षटकानंतर ऑस्‍ट्रेलियाची धावसंघ्‍या ५ बाद १५४ अशी होती. शेवटच्‍या २४ चेंडूत ऑस्‍ट्रेलियाला विजयासाठी ५५ धावांची गरज होती. शेवटच्‍या षटकांमध्‍ये भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन  अत्‍यंत खराब झाले. १७ षटकात भुवनेश्‍वर कुमारने तीन वाइड बॉल टाकले. त्‍याने या षटकात १५ धावा दिल्‍या. १८व्‍या शतकात हर्षल पटेल याने २२ धावा दिल्‍या. तर भुनवेश्‍वरने टाकलेल्‍या १९ व्‍या षटकात मैथ्‍यू वेड याने तीन चौकार लगावले. त्‍याने या षटकात १६ धावा फटकावल्‍या.  २० षटकात ऑस्‍ट्रेलियाला जिंकण्‍यासाठी केवळ २ धावांची गरज होती. यावरुन गोलंदाजांच्‍या कामगिरी स्‍पष्‍ट होते. विश्‍वचषक टी-२० स्‍पर्धेत आधी भारतीय गोलंदाजांचे प्रदर्शन संघाची चिंता वाढविणारे ठरले आहे.

बुमराह दुखापतग्रस्‍त तरीही टीममध्‍ये कसा?

भारतीय संघाने जसप्रीत बुमराह याने कमबॅक केले आहे. दुखापतीमुळे तो आशिया चषक स्‍पर्धेतला मुकला होता. मंगळवारी झालेल्‍या सामन्‍यात बुमराह याला स्‍थान देण्‍यात आले नाही. तो फीट नसेल तर त्‍याला संघात स्‍थान का देण्‍यात आले, असा सवाल केला जात आहे. आता तो दुसरा व तिसरा टी-२० सामन्‍यात खेळेल, असे मानले जात आहे. बुमराह हा शेवटच्‍या षटकांमध्‍ये उत्‍कृष्‍ट गोलंदाजी करतो त्‍यामुळे ऑस्‍ट्रेलियाविरुद्‍धच्‍या पहिल्‍या टी-२० मध्‍ये खेळत असता तर निश्‍चितच भारताला याचा फायदा झाला असता, असे काही क्रिकेट समीक्षकांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news