

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी 'ऑपरेशन लोटस'वरुन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना टोला लगावला आहे. कर्नाटकमध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबविण्याचा प्रयत्न करेल मात्र राज्यात काँग्रेसचे नेते मजबूत आहेत. कर्नाटक राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल बहुमताकडे सुरु आहे. अशातच भाजप कर्नाटकमध्ये 'ऑपरेशन लोटस' राबवेल, अशी भीती काँग्रेसचे काही नेते व्यक्त करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपने कर्नाटकमध्ये 'ऑपरेशन लोटस' होऊ शकत नाही कारण या राज्यातील काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य शिंदे नाहीत. कर्नाटकात काँग्रेसचे मजबूत आहेत.
कर्नाटकात सत्ता गमावत असताना आता भाजपचा प्लॅन बी तयार आहे. घोडेबाजार करण्यासाठी त्यांनी प्रचंड पैसा जमवला आहे. त्यांनी 20000 कोटींपैकी 1000 कोटी खर्च केले तर ऑपरेशन लोटस होऊ शकते. मात्र कर्नाटक काँग्रेसमध्ये कोणीही ज्योतिरादित्य शिंदे. राज्यातील काँग्रेसचे सर्व नेते मजबूत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा :