पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक बहुमताकडे आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. काँग्रेसच्या या घवघवीत यशानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले,"पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला या विजयाचे सर्व श्रेय मी राज्यातील काँग्रेस कार्यकत्यार्त्यांना देतो. त्यांनी अपार कष्ट केले त्यामुळे राज्यात खोटेपणाचा पर्दाफाश झाला." ( Karnataka Election Results 2023 )
यावेळी डी. के. शिवकुमार म्हणाले की, "सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना मी विजयाचे आश्वासन दिले होते. जेव्हा मी कारागृहात होतो तेव्हा सोनिया गांधी मला कारागृहात भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी मी पदावर राहण्यापेक्षा कारागृहात राहणे पसंत केले. पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला." ( Karnataka Election Results 2023 )
डी. के. शिवकुमार यांनी कनकापुरा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. कनकपुरा जागेवर डीके शिवकुमार यांचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. शिवकुमार यांनी राज्यात काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.
हेही वाचा :