Karnataka Election Result 2023 : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वच उमेदवारांचा पराभव

Karnataka Election Result 2023 live updates
Karnataka Election Result 2023 live updates
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र एकीकरण समितीचा विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. पाच मतदारसंघातील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला असून यापैकी दोन उमेदवार मातब्बर असूनही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर.एम. चौगुले रिंगणात आहेत. हेब्बाळकर यांनी चाळीस हजारांचे मताधिक्य घेतल्याने त्यांचा पराभव निश्चित आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील यांना तोडीस तोड अशी टक्कर देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचा 11762 मतांनी पराभव झाला आहे. खानापूर मतदार संघात भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर विजयी झाले असून काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना अवघी 9520 मते मिळाली आहेत.

बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळूरकर यांना अवघी 6309 मते मिळाली आहेत. यमकनमर्डी मतदारसंघातून म ए समितीच्या उमेदवारीवर मारुती नाईक हे थांबले होते. त्यांना अवघी 1936 मते मिळाली आहेत.

अखेरच्या टप्प्यात मिळालेले उमेदवार निहाय मतदान

बेळगाव दक्षिण :
अभय पाटील भाजप – 76249
रमाकांत कोंडूस्कर मए समिती – 64,487
मताधिक्य 11762 भाजप विजयी

बेळगाव ग्रामीण :
लक्ष्मी हेब्बाळकर काँग्रेस – 86171
आर. एम. चौगुले मए समिती – 40386
नागेश मन्नोळकर भाजप – 35525
मताधिक्य 40,000

खानापूर
विठ्ठल हलगेकर भाजप – 80557
अंजलीताई निंबाळकर काँग्रेस – 29937
मुरलीधर पाटील मए समिती – 9520
मताधिक्य 50100

बेळगाव उत्तर
राजू सेट, काँग्रेस – 43640
डॉ. रवी पाटील, भाजप – 40658
ॲड. अमर येल्लुरकर मए समिती – 6309
काँग्रेस आघाडीवर

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news