

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : देशात लाखो कोटींची रस्त्याची कामे करीत असताना एकाही कंत्राटदाराकडून कमिशन घेतलेले नाही. एकाही कंत्राटदाराने कमिशन दिल्याचे म्हटले, तर मी राजकारण सोडेन, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पिंपरी : भाजप नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा
यावेळी गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, देशात ५० लाख कोटींचे रस्त्यांचे जाळं विणलं आहे. नागपुरात ८६ हजार कोटी रुपयांचं काम केलं. मात्र, एकाही कंत्राटदारांकडून कमिशन घेतलं नाही. एकाही कंत्राटदारांनं कमिशन देऊन काम मिळवल्याचं म्हटलं. तर राजकारण सोडून देऊ, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गडकरी त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. अशातच त्यांनी कंत्राटदार आणि कमिशन यावर त्यांचे मत व्यक्त केले. गडकरी यांनी सांगितले की, महानगरपालिकेतील नगरसेवकांना मी बजावून ठेवलं आहे. की कोणतंही असं काम करायचे नाही, की ज्याने बदनामी होईल. तुम्हाला छोटे- मोठे व्यवसाय, उद्योगधंदे स्थापन करायचे असेल, तर मी मदत करतो. पण असे कोणतेही काम करू नका की, ज्यामुळे बदनामी होईल.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ