उत्तर महाराष्ट्र
नाशिक : मुलाच्या लग्नासाठी घरात ठेवलेली रोकड, चांदीची मूर्ती, देवाचा गेठा घेऊन चोरटे पसार
नाशिक : अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत साडेतीन लाखांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उपनगर परिसरात उघडकीस आला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम माधव जाधव (५५, रा. उमा वंदन सोसायटी, इच्छापूर्ती गणेश मंदिराशेजारी, खोडदेनगर) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकाेयंडा व कुलूप तोडून चाेरट्यांनी आतप्रवेश केला. जाधव यांनी मुलाच्या लग्नासाठी तीन लाख ३५ हजारांची रोकड तसेच १० हजारांची लक्ष्मीची चांदीची मूर्ती व देवाचा गेठा असा तीन लाख ४५ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

