

पुढारी ऑनलाइन डेस्क : The Kerala Story : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकावण्यात आले आहे. धमकीच्या मिळालेल्या संदेशानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाविषयी माहिती दिली आहे. एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'द केरला स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पोलिसांना माहिती दिली की क्रू मेंबर्सपैकी एकाला अनोळखी नंबरवून संदेश आला होता. या संदेशात संबंधित क्रू मेंबरला एकट्याने घरातून बाहेर पडू नये तसेच तुम्ही ही कथा दाखवून काही चांगले केले नाही, असे म्हटले होते. The Kerala Story
दरम्यान, पोलिसांनी दिग्दर्शक सुदीप्तो यांच्या माहितीवरून संबंधित क्रू मेंबरला सुरक्षा पुरविली आहे. मात्र, अद्याप लेकी तक्रार न मिळाल्याने एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
द केरला स्टोरी हा चित्रपट केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना लव्ह जिहादमध्ये अडकवून लग्नानंतर त्यांचे धर्मांतरण करण्यात येते. नंतर त्यांना ISIS मध्ये दहशतवादाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. अशा तीन महिलांची ही कथा आहे.
मात्र चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करताना त्यात 32 हजार महिलांचे धर्मांतरण करून त्यांना ISIS मध्ये पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यानंतर विपुल अमृतलाल शाह यांची निर्मिती असलेला आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित चित्रपटाला केरळचे या चित्रपटाला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तीव्र विरोध केला. त्यांनी याला "RSS प्रचार" म्हटले. 'द केरळ स्टोरी' मध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी प्रमुख भूमिकेत आहेत.
दरम्यान, चित्रपटातील या आकड्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर चित्रपटातील या वादग्रस्त आकडा काढून टाकण्यात आला आहे. 32 हजार आकड्याऐवजी तीन महिलांची ही कथा आहे, असे दर्शवण्यात आले आहे.
हे ही वाचा :