The Kerala Story : 'द केरला स्टोरी' चित्रपटावर बंदी, ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माच्या ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांतून या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. आता बातमी येत आहे की पश्चिम बंगाल सरकारने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात या निर्णयाची घोषणा केली.
पश्चिम बंगालच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ‘द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, ‘द केरला स्टोरी’मधून (The Kerala Story) केरळची बदनामी करण्याच्या हेतूने चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत,’ असा आरोप केला होता.
बॉलीवूड चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून या चित्रपटाबद्दल गदारोळ सुरू झाला असून याबाबतचा वाद कोर्टात पोहोचला आहे. मात्र, या गदारोळात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केल्याचे समोर आले आहे.
विपुल अमृतलाल शहा यांची प्रतिक्रिया (The Kerala Story)
पश्चिम बंगाल सरकारने ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान विपुल यांनी, पं. बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यास आम्ही कायदेशीर मार्ग स्वीकारू. ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही तेथील राज्य सरकार आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे असे आम्ही म्हणत नाही. कारण जिथे भाजपचे सरकार नाही अशा अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट सुरू आहे. कुद्द केरळमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अधिकाधिक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त करावा अशी आमची इच्छा आहे, असेही विपुल शहा म्हणाले.
#WATCH | Reacting on his film #TheKeralaStory being banned in West Bengal, film’s producer Vipul Shah says, “If that is what she has done, we will take legal action. Whatever is possible under the provisions of law, we will fight.” https://t.co/FY3Qz8cljK pic.twitter.com/LeY23flUOg
— ANI (@ANI) May 8, 2023