The Dirty Picture : विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ची १२ वर्षे, खास फोटो पाहा

vidya balan
vidya balan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : द डर्टी पिक्चरला १२ वर्षे पूर्ण होत असून मिलन लुथरिया यांनी या चित्रपटाच्या खास आठवणी ना उजाळा दिला आहे. (The Dirty Picture) दि डर्टी पिक्चर हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री आणि नृत्यांगना सिल्क स्मिताच्या जीवनातून आणि काळापासून प्रेरित असलेला एक चरित्रात्मक संगीत चित्रपट होता. आज या चित्रपटाने 12 वर्ष पूर्ण केली आहेत. (The Dirty Picture)

संबंधित बातम्या –

मिलन लुथरिया दिग्दर्शित आणि विद्या बालन, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह आणि तुषार कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट 2 डिसेंबर 2011 रोजी जगभरात हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित झाला. बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित, हा चित्रपट मेगा हिट ठरला. आणि बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली.

लुथरियाच्या सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाकांक्षी कामांपैकी असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. या बद्दल बोलताना मिलन म्हणतात- " द डर्टी पिक्चर" तयार करणे हा एक आव्हानांनी भरलेला प्रवास होता. अनेक आव्हाने आली अनेक गोष्टी कुठून सुरू होणार असे प्रश्न होते. प्रथम आम्हाला कास्टिंगमध्ये अडथळे आले. परंतु विद्या बालनची माझी निवड यशस्वी ठरली. चित्रीकरणाने आणखी एक आव्हान उभे केले कारण विद्याची प्रतिमा तिच्या पात्राशी विसंगत होती तरीही विक्रम गायकवाडच्या झटपट परिवर्तनाने रेश्माला जिवंत केले. आमचे शेवटचे आव्हान वितरकांनी उभे केले तेव्हा होते. शीर्षकाबद्दल चिंता होती पण एकता कपूरच्या दृढ निश्चयाने स्वतःचे पैसे लावून चित्रपटाचे प्रदर्शन सुनिश्चित केले आणि रिलीजनंतरच्या सोमवारी भारतात फक्त महिलांसाठी खास शो झाला होता."

vidya balan
vidya balan

चित्रपटात अफलातून भूमिका साकारणारा इमरान हाश्मी म्हणतो "द डर्टी पिक्चरला १२ वर्षे पूर्ण होत असताना हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. चित्रपटाचे बोल्ड सीन, कथा आणि टीमची वास्तववादी दृष्टी प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देऊन गेली" डर्टी पिक्चरने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि एका नवा रेकॉर्ड केला. तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकून एक नवी उंची गाठली आणि चित्रपट हिट ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news