Indian Idol 14 : ‘नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण उत्कर्ष तुझे नावदेखील जोडले गेले’ | पुढारी

Indian Idol 14 : 'नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण उत्कर्ष तुझे नावदेखील जोडले गेले'

पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी सदाबहार संगीतकार जोडी आनंद-मिलिंद सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 14 (Indian Idol 14 ) या लोकप्रिय गायन रियालिटी शोच्या मंचावर उपस्थित असणार आहेत. ‘हिट्स ऑफ आनंद मिलिंद’ भाग साजरा करताना स्पर्धक या संगीतकार जोडीची लोकप्रिय गाणी सादर करतील. परीक्षक श्रेया घोषाल तसेच या वीकएंडचे अतिथी परीक्षक शेखर रावजियानी उपस्थित असतील. (Indian Idol 14 )

संबंधित बातम्या –

नागपूरहून आलेला स्पर्धक ‘महाराष्ट्र की शान’ उत्कर्ष वानखेडे ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील ‘ए मेरे हमसफर’ आणि ‘संगीत’ चित्रपटातील ‘ओ रब्बा कोई तो बताए’ ही गाणी सादर करून प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे लक्ष वेधून घेईल. या दोन्ही गाण्यांचे संगीतकार आनंद-मिलिंद होते आणि या भागात ते दोघे या गाण्यांशी निगडित आठवणी सांगतील.

उत्कर्षचे कौतुक करताना शेखर रावजियानी म्हणाला, “तुझा आवाज खूप सुंदर आणि सुमधुर आहे, जो रेकॉर्डिंगसाठी फारच अनुकूल आहे”.

श्रेयाने उत्कर्षला या शब्दांत दाद दिली, “मी नुकतीच नागपूरहून आले आणि खरंच सांगते, मी तिकडे एकच आवाज ऐकला, आणि तो आवाज म्हणजे उत्कर्षचा! तुझ्या शहरातील प्रत्येकाला तुझा खूप अभिमान वाटतो. मला या गोष्टीचा आनंद वाटतो की, समग्र देशातून तुझे कौतुक होत आहे, विशेषतः तुझ्या शहरातून. नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण आता तुझे नाव देखील या शहाराशी जोडले गेले आहे.”

Back to top button