Akshay Kumar : फॅन्ससाठी खुशखबर, अक्षय कुमार घेवून येतोय हटके स्टोरी

Akshay Kumar
Akshay Kumar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar ) त्याच्या एका मागून एक हिट चित्रपटात दिसत आहे. त्याच्याकडे आगामी चित्रपटांच्या यादीत 'सोरारई पोटरु' चित्रपटाचा हिंदी रिमेक, बडे मियाँ छोटे मियाँ, स्काय फोर्स, हेरा फेरी ३ आणि हाऊसफुल ३ या चित्रपटाचा समावेश आहे. दरम्यान चाहत्यांना आणखी एक खुशखबर देत अक्षयचा आगामी 'द अनटोल्ड स्टोरी आफ सी. शंकरन नायर' हा चित्रपट घेवून येत आहे. या माहितीमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या 

करण जोहरची निर्मित अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar ) 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट वकील आणि राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय जालियनवाला बाग हत्याकांडच्या सत्यागृहासाठी लढा दिल्याचा प्रसंग यात दाखवण्यात येणार आहे. अक्षय कुमार चित्रपटात सी. शंकरन नायर यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर. माधवन हे कालाकर ही दिसणार आहेत.

अक्षयने या चित्रपटाच्या शूटिंगला दिल्लीतील जामा मशिदीपासून सुरुवात केली होती. आता तो मुंबईतील गोरेगाव भागात असलेल्या फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत आहे. येथे शूटिंगसाठी जालियनवाला बागचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर चित्रपटाची टीम जवळपास २० दिवस शूटिंग करणार आहे. त्यानंतर टिम पुढील शुटिंगसाठी मुंबईतील अलिबागला जाणार आहे. अलिबागमध्ये या चित्रपटाचे पुढील शेड्यूल शूट करण्यात येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी करत आहेत. तर अभिनेत्री अनन्या पांडे या चित्रपटात सी. शंकरन नायर यांच्या कनिष्ठ वकिलाची भूमिका साकारत आहे. सी. शंकरन नायर हे भारतातील ब्रिटिश राजवटीत वकील होते. १९१५ मध्ये व्हाईसरॉयच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध संघर्ष करावा लागला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news