

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडिओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडिओ काळजाचा ठेका चुकवितात. तर काही व्हिडिओ दीर्घकाळ आठवणीत राहतात. सध्या सोशल मीडियावर अशाच काळजाला भिडणारा एका एअर होस्टेसचा व्हिडिओ व्हायरल ( viral Video ) होत आहे. यातून तिने विमानातील प्रवाशांसह नेटकऱ्यांना भावूक केलं आहे.
इंडिगो एअरलाईन्सच्या सुरभी नायर या एअर होस्टेसचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( viral Video ) झाला आहे. या व्हिडिओत सुरभी निळ्या रंगाच्या एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये फोनवर बोलताना दिसत आहे. सुरभी आपल्या सेवेतून निवृत्त होत असून निरोप संभारंभादरम्यान बोलताना भावूक होताना दियतेय.
यावेळीच्या भाषणात तिने 'मी कधी विचार केला नव्हता की, हा दिवस इतक्या लवकर येईल. माझे हृदय भरून आल्याने मला काय बोलावे हे समजत नाही. या कंपनीने मला सर्व काही दिले. काम करण्यासाठी ही एक चांगली संस्था आहे. माझ्यासाठी ही सर्वोत्कृष्ट कंपनी आहे कारण इथे प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जाते. मला या सेवेतून निवृत्त व्हायचे नाही. परंतु, जावे लागणार आहे.' असे तिने म्हटले आहे. व्हिडिओ विमानातील प्रवाशासोबत चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
हा व्हिडिओ 'अमृत सुरेश' नावाच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला ३२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका यूजरने 'मी तुझ्यासोबत प्रवास केला. तुमच्या महान सेवेबद्दल प्रत्येकाने आभार मानले पाहिजेत. तर दुसऱ्या एका यूजरने 'मला माझा निरोप आठवला.' असे म्हटले आहे.
हेही वाचलंत का?