कोल्हापूर : गुणरत्न सदावर्तेंच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी लांबणीवर | पुढारी

कोल्हापूर : गुणरत्न सदावर्तेंच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी लांबणीवर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी अटक करण्यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 21 एप्रिल पर्यंत लांबणीवर पडली आहे.

सरकारी कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने आज मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही. जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग 1 महेश जाधव यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी होणार होती.

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सदावर्ते यांच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.

आज दुपारी त्यावर सुनावणी होणार होती मात्र शाहूपुरी पोलीस ठाणेकडून संबंधित कागदपत्रे न्यायालयात उपलब्ध होऊ न शकल्याने जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी 21 एप्रिलपर्यंत सुनावणी लांबणीवर टाकण्याबाबत अर्ज दाखल केला त्यावर न्यायालयाने 21 रोजी सुनावणी होईल असे सांगितले.

फिर्यादी दिलीप पाटील यांच्यावतीने न्यायालयीन कामकाजात सहभागी होणे बाबत ज्येष्ठ वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला न्यायाधीश जाधव यांनी त्यास मान्यता दिली

सदावर्ते यांना आठवड्यापूर्वी सातारा पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आदेश झाला होता. सायंकाळी त्यांना मुंबईतील कारागृहात हलविण्यात आले. ॲडव्होकेट सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे विशेष पथक रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button