

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात फिरताना हटकल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतलेले दोघे संशयित दहशतवादी निघाले. त्याच धर्तीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) अटक केलेल्या दोघांकडे चौकशी करण्याबरोबरच त्यांच्याशी संबंधित ठिकाणी चाचपणी केली. त्यांचा साथीदार अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दीड वर्षांपासून इम्रान खान व मोहम्मद युनीस साकी हे दहशतवादी एनआयएला गुंगारा देत होते. पुणे पोलिसांबरोबरच समांतर तपास एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) करीत आहेत. एनआयए आणि एटीएस या संस्थेचे पथक तीन दिवसांपासून ठाण मांडून आहे. या दोघांना ज्या भागातून अटक केली, त्या कोथरूड भागात एनआयएच्या अधिकार्यांनी शुक्रवारी भेट दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
घातपाताची तयारी?
कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात दुचाकी चोरताना दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दहशतवादी दुचाकीत
स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट घडविणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहराच्या मध्यभागातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकीत स्फोटके ठेवून स्फोट घडविण्यात आल्याची घटना घडली होती. एनआयए, एटीएस, तसेच पुणे पोलिसांकडून दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे.
भाडेकरूंची नोंद करण्यास टाळाटाळ
इम्रान खान आणि युनूस साकी कोंढवा भागात भाडेतत्त्वावर राहत होते. दोघे ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावरत होते. दोघांची माहिती घरमालकाला नव्हती. घरमालकाने त्यांच्याशी भाडेकरार केला नव्हता. कोंढवा पोलीस ठाण्यात भाडेकरूंची नोंद घरमालकाने केली नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
हे ही वाचा :