अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर | पुढारी

अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर ईडीच्या अटकेत असलेले आमदार एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अनेक वेळा जामीनासाठी अर्ज फेटाळला जात होता. अखेर दीड वर्षानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आमदार खडसे यांना दिलासा मिळाला आहे.

भाजपा-शिवसेना सरकारमध्ये आमदार एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील भोसरी एमआयडीसीत प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला. याप्रकरणी ईडीने आधी त्यांची चौकशी केली होती. यानंतर ७ जुलै २०२१ पासून त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे अटकेत होते. वारंवार जामीन अर्ज फेटाळले जात असल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज (दि २१) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

दीड वर्षापासून जेलमध्ये

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी हे साधारण दीड वर्षापासून जेलमध्ये होते.  ईडीच्या कारवाईत त्यांना ही जेल झाली होती. याच प्रकरणामुळे एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच या प्रकरणी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील तपासादरम्यान चौकशी करण्यात आली होती. यानंतर जावई गिरीष चौधरी यांची ईडीकडून चौकशी सुरू होऊन अटक झाली होती.

हेही वाचा 

Back to top button