

पुढारी ऑनलाईन डेस्क : घायाळ करणाऱ्या अदा आणि ठुमके लावत लावणी डान्सर गौतमी पाटीलचा डान्स आपण पाहिलाच आहे.(Gautami Patil) आता तिच्या आणखी एका व्हिडिओची चर्चा होत आहे, ती म्हणजे पंजाबी गाण्याची हरयानवी बोल असलेले हे गाणे गौतमीवर चित्रीत करण्यात आले आहे. सुंदर निसर्गरम्य ठिकाणी गौतमीचे हे गाणे मनाला भिडणार आहे. (Gautami Patil)
गौतमीचे तेरा पता हे नवे पंजाबी गाणं भेटीला आहे. युट्यूबवर तुम्ही हे गाणं पाहू शकता. तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करून नवीन गाणं येत असल्याची माहिती दिली होती. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठीनंतर गौतमी पंजाबी गाण्यांमध्ये तडका लावला आहे. गौतमी पाटील ही सोशल मीडियावर देखील ॲक्टिव्ह असते. गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर गाण्याची झलक शेअर केली होती.
गौतमीचे हे गाणे पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला तिच्या पोशाखावरूनही ट्रोल केले आहे.
गौतमी पाटील गाणी आणि चित्रपटांसोबत वेब सीरीजमध्येही झळकणार आहे. ती वेबसीरीजमध्येही दिसणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आता उत्सुकता लागून राहिली आहे. गौतमी डान्समुळेच नाही सोशल मीडिया स्टार बनलीय. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात.
दरम्यान, तिच्या हावभावांवरून तिला ट्रोल गेले. अनेक लावणी नृत्यांगनांनी तिच्यावर टीका केली. गौतमी ही मुळची धुळ्याची आहे. तिचे शिक्षण कमी झाले आहे. डान्स शिकण्यासाठी ती पुण्यात आली, अशी माहिती तिने एका मुलाखतीत स्वत: दिली होती.