Kashmera Shah with Krushna Abhishek
Kashmera Shah with Krushna Abhishek

Kashmera Shah Kiss Video : मद्यधुंद अवस्थेत कश्मीराचे कृष्णा अभिषेकसोबत लिपलॉक

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील एका पार्टीनंतर कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Kashmera Shah Kiss Video) त्याची पत्नी कश्मीरा शाहसोबत स्पॉट झाले. यावेळी कृष्णाची पत्नी कश्मीरा मद्यधुंद अवस्थेत दिसली. इतकचं नाही तर तिने सार्वजनिकपणे कृष्णाला लिपलॉक केले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. आता लोक तिच्या या वागण्यामुळे तिला ट्रोल करत आहेत. पण, कश्मीराने आपण सार्वजनिकपणे किस का केलं, याबद्दलचा खुलासा केला आहे. (Kashmera Shah Kiss Video)

कश्मीरा म्हणाली, मला माहिती आहे की, लोक काय म्हणत आहेत. मी खूप दारू प्यायले होते आणि मला सरळ उभारतादेखील येत नव्हतं. लॉस एंजेलिसहून मी परतले, घरी पोहोचले आण मग पार्टीत पोहोचले. एका वाईनच्या ग्लासामुळे इतका परिणाम होऊ शकोत, हे मला माहिती नव्हतं. होय, मी माझ्या नवऱ्याला माझ्याजवळ ओढलं. कारण दीर्घकाळ आम्ही दोघे भेटलो नव्हतो. जवळपास ३ आठवडे आम्ही भेटलो नाही, मी त्याची खूप आठवण केली. मी खूप थकले होते. सर्व कॅमेरावाले तिथे आले. जेव्हा मी कृष्णाला किस केलं, तेव्हा पॅपराझींनी ते कॅमेराबद्ध केलं.

हा व्हिडिओ बिग बॉसच्या पार्टीनंतरचा आहे. या पार्टीत प्रियांका चहर चौधरीदेखील दिसली. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कश्मीराला ट्रोल करणं सुरुवात केली. ती नशेत असल्याचं ट्रोललर्सनी म्हटलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news