Billi Billi Song :सलमान पूजा हेगडेसोबत ‘बिल्ली बिल्ली’वर थिरकला | पुढारी

Billi Billi Song :सलमान पूजा हेगडेसोबत 'बिल्ली बिल्ली'वर थिरकला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानने आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत बॉलिवूड इंडसsट्रीत अनेक धमाकेदार (Billi Billi Song) डान्स नंबर्स करून फॅन्सवर जादू कायम ठेवलीय. आता त्याचा आणखी एक डान्स नंबर पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे बोल बिल्ली बिल्ली असे आहे. या गाण्याचा टीझर रिलीज झाला असून तो अभिनेत्री पूजा हेगडेसोबत ठुमके लावताना दिसणार आहे. (Billi Billi Song)

उत्साहवर्धक संगीत, हुक स्टेप्स आणि सलमानच्या चार्मिंग लूक्सशिवाय लीडींग लेडी पूजासोबत केमिस्ट्री जुळणार आहे. बिल्ली बिल्ली गाण्यात सलमान पांढर्या शर्टसोबत ब्लॅक जॅकेट, स्लीक हेअरस्टाईल आणि फुल स्वॅगनध्ये दिसतो आहे. या गाण्यात ३००हून अधिक बॅकग्राऊंड डान्सर आहेत. सलमानचे या गाण्यातील नवे हुक स्टेप्स करू शकता.

चित्रपटामध्ये पूजा-सलमान शिवाय भूमिका चतावला, विजेंदर लिंह, अभिमन्यू सिंक, राघव जुयाल, पलक तिवारी, शहनाज गिल, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, विनाली भटनागर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. सोबतच यामद्ये ॲक्शन, रोमान्सने भरपूर सलमानचा चित्रपट आहे.

Back to top button