

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जी-20 परिषदेनिमित्त गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) तात्पुरता वाहतूक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 23 जूनपर्यंत विद्यापीठ चौकातून उजवीकडे वळून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जी-20 परिषदेनिमित्त विद्यापीठात प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 23 जूनपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून, विद्यापीठ चौकातील वाहतूकव्यवस्थेत 23 जूनपर्यंत तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. विद्यापीठ चौकातून उजवीकडे वळून वाहनचालकांना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील वाहतूक बदल तात्पुरत्या स्वरूपात आहे, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.
हेही वाचा: