Twitter down : ट्विटर डाउन, यूजर्संना लॉगिन करण्यात अडचणी | पुढारी

Twitter down : ट्विटर डाउन, यूजर्संना लॉगिन करण्यात अडचणी

पुढारी ऑनलाईन : अनेक युजर्संना शुक्रवारी (दि.14) सकाळी त्यांचे ट्विटर अकाउंट ओपन करताना अडचणी आल्या. युजर्संना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लॉगिन करताना एरर मेसेज (Twitter down) येत आहे. यामध्ये Something went wrong, but don’t fret — let’s give it another shot (Try Again) असा मेसेज स्क्रीनवर दिसत आहे. जगभरातील वेबसाइट्सवर नजर ठेवणारी आणि वेबसाइट्सवरील आउटेजची माहिती देणारी एजन्सी DownDetector च्या मते, एलन मस्क यांच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मला जगातील काही भागांमध्ये आउटेजची समस्या येत असल्याचे म्हटले आहे.

Twitter Down

आज सकाळी ३ वाजल्यापासूनच ही समस्या जाणवत आहे. ७ वाजेपर्यत ट्विटबद्दलच्या समस्या आणखी वाढल्या. देशभरातील ट्विटर यूजर्ससह भारतातील यूजर्संनी देखील ट्विट अकाऊंट काम करत नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान भारतातही अनेकांनी ट्विटर काम करत नसल्याचे सांगितले आहे.

Twitter down: डेस्कटॉप व्हर्जनमध्ये येत आहे समस्या

मायक्रोब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटर आज सकाळपासून काही वापरकर्त्यांसाठी बंद (Twitter down) असल्याचे दिसत आहे. Twitter वर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता ते ओपन होत नसल्याच्या तक्रारी काही यूजर्संनी केल्या आहेत. DownDetector असेही म्हटले आहे की ही समस्या’ मोबाईलवरील अॅपच्या ऐवजी Twitter च्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये फक्त दिसून आली आहे. “Something went wrong but don’t fret — let’s give it another shot” असा मेसेज काही यूजर्संना Twitter वर लॉगइन करताना दिसून येत आहे.

ट्विटर मालक एलोन मस्कच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या भविष्याबद्दल अनिश्चिततेच्या आठवड्यानंतर ट्विटरने आज कर्मचाऱ्यांना एक मेल केला. त्यामध्ये कर्मचार्‍यांना ईमेलद्वारे सांगण्यात आले की, ट्विटरचे कार्यालय तात्पुरते बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. ट्विटरने असेही म्हटले आहे की, त्यांची कार्यालये तात्पुरती बंद करण्यात येत आहेत. “प्रत्येक कर्मचारी, ट्विटर सिस्टम आणि ग्राहक डेटाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ट्विटर ऑफिसेस बंद करण्यात येत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button