Twitter मध्ये झाला मोठा बदल; पोस्‍ट केलेले ट्विटही करता येणार ‘एडिट’ ; PayTm च्या संस्थापकांनी दिली माहिती | पुढारी

Twitter मध्ये झाला मोठा बदल; पोस्‍ट केलेले ट्विटही करता येणार 'एडिट' ; PayTm च्या संस्थापकांनी दिली माहिती

पुढारी ऑनलाईन: ट्विटरने Tweet Edit हे फीचर प्रथम अमेरिकेत आणि नंतर ठराविक देशातील ट्विटर (Twitter)युजर्ससाठी उपलब्ध करून दिले आहे. या फिचरच्या माध्यमातून यूजर्स एखादी पोस्ट केल्यानंतर ३० मिनिटांच्या आत कमीत कमी पाचवेळा त्यांचे ट्विट एडिट करू शकणार आहेत; पण हे फीचर सध्या तरी फक्त आयफोन यूजर्ससाठीच सक्षम असल्याचा दावा केला जात आहे.

ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट जगातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍ती एलॉन मस्क याने नुकतीच विकत घेतली आहे. मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरमध्ये मोठे बदल होत आहेत. यानंतर असाही दावा केला जात आहे की, भारतीय ट्विटर यूजर्ससाठी Tweet Edit बटण जारी केले आहे. PayTm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी देखील आपल्या ट्विटरवर Tweet Edit बटणचा एक स्क्रिनशॉट शेअर करत या नवीन फिचरची माहिती दिली आहे. यामध्ये डाव्या बाजूच्या तीन बिंदूंवर क्लिक केल्यानंतर Edit Tweet हा पर्याय दिसत आहे. याचबरोबर अलीकडे कंपनीन डाऊनलोड हे देखील नवीन फीचर (Twitter) आणले आहे.

पेटीएमच्या संस्थापकांनी Edit Tweet बटणाची दिली माहिती

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्विटच्या माध्यमातून ट्विट एडिट फीचर्सची माहिती दिली आहे. शर्मा यांनी ट्विट करून लिहिले, ‘हे ट्विट पोस्ट केल्यानंतर एडिट केले जाईल.’ यानंतर त्यांनी हे ट्विट एडिट केले आणि लिहिले, ‘आता हे एडिट केलेले ट्विट आहे!’ विजय शेखर यांनी त्यांच्या पोस्टसह एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ट्विट एडिट (Twitter) करण्याचा पर्याय दिसत आहे.

हेही वाचा:

Back to top button