

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने (Tara Sutaria) पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तारा सुतारियाने या फोटोसोबत एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. या फोटोंवर अभिनेता अर्जुन कपूरशिवाय अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांचा उड्या पडत आहेत. तारा सुतारियाचा हा धमाकेदार अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत. हे फोटो शेअर करून तिने इंटरनेटचा पारा चढवला आहे. ती डेनिम शॉर्ट्स आणि ब्रालेट क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. लूक कम्प्लिट करण्यासाठी ताराने या ड्रेससोबत एक लॉन्ग जॅकेटदेखील घातले आहे. (Tara Sutaria)
तारा सुतारियाचा हा धमाकेदार अवतार पाहून चाहते कमेंट करत आहेत. हे फोटो शेअर करून तिने इंटरनेटचा पारा चढवला आहे. ती डेनिम शॉर्ट्स आणि ब्रालेट क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ताराने या ड्रेससोबत एक लांब जॅकेट घातले आहे.
तिचे हे फोटो शेअर करत तारा सुतारियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी मस्त राहण्याचा प्रयत्न करत आहे.' या कॅप्शनवर प्रतिक्रिया देताना अभिनेता अर्जुन कपूरने लिहिले की, 'मी या शूटमध्ये प्रवेश केल्यानंतरच तू कूल झालीस…' यासोबत अर्जुनने स्माईल इमोजीही शेअर केला आहे.
ताराच्या या बोल्ड फोटोंवर अर्जुन व्यतिरिक्त अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरला प्रतिक्रिया देताना तिने लिहिले की, 'आपले सौंदर्य एका वाक्यात स्पष्ट नाही होऊ शकत. तू खूप गोंडस आणि सुंदर आहेस.' नेटकरी तिच्या या फोटोंवर सतत कमेंट करत आहेत.
तारा सुतारियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच अर्जुन कपूरसोबत 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. दोघांनीही या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला होता, ज्याचे लोक कौतुक करत होते.
हेदेखील वाचा-