गेल्या ७ वर्षापासून राज्यातील ऊस तोडणी मशीन घेतलेल्या शेतक-यांनी सरकारकडून अनुदान मिळणार या आशेने कोट्याRaju Shettiवधी रूपयाची कर्जे काढून यंत्र खरेदी केलेली आहेत. राज्यातील ऊस तोडणी यंत्र मालकांच्या प्रलंबित अनुदानाबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षात असणारे राज्यकर्ते यांच्या धोरणांमुळेच राज्यातील ९०० हून अधिक मशीनधारकांचा बळी जात आहे. यामुळे सरकारने तातडीने ३८७ कोटी रूपयाच्या थकीत अनुदानाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील वर्षीचा गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुंबई आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन मांडले.