Diveagar Suvarnaganesh Temple | दिवेआगरचे सुवर्णगणेश मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान

पर्यटनासह धार्मिक क्षेत्र म्हणून विकासाच्या मार्गावर
Diveagar Suvarnaganesh Temple
दिवेआगरचे सुवर्णगणेश मंदिरpudhari photo
Published on
Updated on

श्रीवर्धन ः समीर रिसबूड

निसर्गाचे वरदान लाभलेल्या परशुरामाच्या पवित्र अशा कोकणभूमीत अनेक मंदिरे आहेत. त्या मंदिरांमुळे परिसराला नावलौकिक मिळाला आहे. यामध्ये दिवेआगरच्या सुवर्णगणेश मंदिराचा अगत्याने समावेश करणे उचित ठरेल. हे मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान ठरले आहे. पर्यटनासह धार्मिक क्षेत्र म्हणूनही दिवेआगर विकासाच्या मार्गावर आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे खेडेगाव. विस्तीर्ण व निळाशार समुद्रकिनारा, नारळ सुपारीच्या दाट झाडीत लपलेली कौलारू घरे असे दिवेआगर गाव प्रसिद्धीस आले ते इथे सापडलेल्या श्री सुवर्ण गणेशामुळे.17 नोव्हेंबर 1997 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे कलम लावत असताना तीस किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली होती. गावकर्‍यांच्या उपस्थितीत पेटी उघडली गेली असता आतमध्ये एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा आढळली.

महत्त्वाचे म्हणजे पेटीमध्ये एका छोट्या तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढविण्यासाठी 280 ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार होते. ही गणेश प्रतिमा म्हणजे भरीव मूर्ती नसून मुखवटा आहे. ज्या मूर्तीवर हा मुखवटा चढवला जात असेल ती प्राचीन मूळ आणि भरीव मूर्ती मात्र मिळून आली नव्हती.

सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर सापडली असल्याने प्रचलित कायद्यानुसार सरकारदरबारी जमा करण्यात आली नव्हती. सुवर्ण गणेश प्रतिमा आणि तांब्याची पेटी मंदिरात ठेवण्यात आली होती. सुवर्ण गणेश प्रतिमेवर मस्तक, कान, खांदे यावर चाफ्याची फुलं आणि पायरी आंबे कोरलेले दिसतात. यावरून ही मूर्ती प्राचीन असल्याची खात्री पटते. माघ शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्मोत्सव आणि कार्तिक वद्य चतुर्थीला सुवर्णगणेशाचा प्रकटदिन उत्साहाने साजरा केला जातो. सिद्धनाथ, केदारनाथ यांच्या चैत्र महिन्यात होणार्‍या यात्रेमध्ये माणसाच्या पाठिला गळ टोचून वर्तुळाकार फिरवले जाते. हा खेळ पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते.

Diveagar Suvarnaganesh Temple
श्री गणेश दर्शन | नाशिकचा नवसाला पावणारा 'नवश्या गणपती'

श्री सुवर्ण गणेशाच्या आगमनाने दिवेआगर गावाची भरभराटी झाली. देशाच्या विविध कानाकोपर्‍यातून भक्तगण दिवेआगर गावाला भेट देऊ लागलेत. येथे पांडवकालीन प्राचीन मंदिरे देखील आहेत. दिवेआगर साठी लाभलेला साडे चार किलोमीटरचा समुद्रकिनारा यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. दिवेआगर गाव हे पर्यटनाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आला.

- सिध्देश कोसबे, सरपंच दिवेआगर

मंदिराचा रंजक इतिहास

सुवर्णगणेशाचा इतिहास खूपच रंजक आहे.17 नोव्हेंबर 1998 अर्थातच हिंदू दिनदर्शिकेनुसार संकष्टी चतुर्थी दिवसाला जमिनीखाली सुमारे चाळीस ते पन्नास सेंटिमीटर खोलीवर एक तांब्याची पेटी सापडली.पेटीचे वजन तीस किलो,लांबी सदतीस पुर्णांक पाच सेमी (37 इंच),रुंदी पंचेचाळीस सेमी (18 इंच), उंची सतरा पुर्णांक पाच (7 इंच) होते. सुवर्णगणेश ही गणपतीची संपूर्ण मूर्ती आहे.शुद्ध चोविस कॅरेट सोन्याची मूर्ती आहे.त्याचे वजन एक किलो आणि तीनशे ग्रॅम,साठ सेमी (चोवीस इंच) उंचीसह. तयार केलेले शिल्प तीनशे ते चारशे वर्षे प्राचीन आहे.

Diveagar Suvarnaganesh Temple
Nashik Ganesh Visarjan | मिरवणुकीत एका पथकाला फक्त 'इतकीच' वाद्य वाजवता येणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news