Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात ‘सुस्वागतम्’… नव्या पोर्टलद्वारे ई-पासेस मिळणार
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने 'सुस्वागतम्' या नावाने पोर्टल सुरू केले आहे. वकील, वादी-प्रतिवादी, प्रशिक्षणार्थी आणि अभ्यागतांना या पोर्टलद्वारे ई-पाससेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ई-पासेसमुळे न्यायालयात थेट प्रवेश मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात थेट प्रवेश करण्यासाठी या पोर्टलद्वारे ऑनलाईनवरून नोंदणी करावी लागणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कलम 370 वरील नियमित सुनावणी सुरू असतानाच नव्या पोर्टलची घोषणा केली. सुस्वागतम अॅप मोबाईल फ्रेंडली असणार आहे. या वेबआधारित पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर आपण वकिलांना भेटू शकता. याशिवाय सुनावणींना उपस्थित राहण्याची मुभाही याद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. Supreme Court
9 ऑगस्ट रोजी प्रायोगिक तत्त्वावर 10 हजार जणांनी ई-पोर्टलवर नोंदणी केली. यापुढे रांगेत थांबावे लागणार नाही. अथवा प्रतीक्षाही करावी लागणार नाही. स्वागतकक्षातून पास घेऊन न्यायालयात प्रवेश करावा लागतो. सकाळपासून खूप गर्दी असल्यामुळे लोकांना खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते. या पोर्टलमुळे आता काऊंटरवर प्रतीक्षा करावी लागणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, ई-पोर्टलवरून पास उपलब्ध करून घेताना पोलिसांकडून क्लिअरन्स प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. Supreme Court
हे ही वाचा :

