

हातकणंगले : पुढारी वृत्तसेवा : बांगलादेश येथे वर्ल्ड ओकिनवा गोजिरीय कराटे फेडरेशन व बांगलादेश ओकिनवा गोजिरीयु कराटे फेडरेशन यांचे वतीने भरवणेत आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये ओकिनवा गोजिरीय कराटे असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष व शिक्षक संतोष अशोक क्षीरसागर यांनी काथा प्रकारात गोल्ड मेडल व खुमिथ्ये प्रकारात ब्राँझ मेडल मिळवले. या स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, इंडोनिशिया व श्रीलंका या देशांमधील एकूण ७०० पेक्षाही जास्त खेळाडुनी भाग घेतला होता.
भारतामधून मुंबई येथील ओकिनवा गोजिरीयु कराटे फेडरेशन ऑफ इंडियाच्या टिममधून संतोष क्षीरसागर यांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांनी स्पर्धेव्दारे कराटे खेळामधील पश्चिम महाराष्ट्रातील पहिले सुवर्ण पदक पटकवून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे . संतोष क्षीरसागर यांचे यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच त्यांच्या या यशाबद्दल त्यांची सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचे वतीने कसबा बावडा येथील कराटे हॉलपासून भव्य मिरवणूक काढणेत आली.
.हेही वाचा