महापुरुषांचा अपमान होईल अशी विधाने थांबवा : राज ठाकरेंचे भाजप-काँग्रेसला आवाहन

महापुरुषांचा अपमान होईल अशी विधाने थांबवा : राज ठाकरेंचे भाजप-काँग्रेसला आवाहन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकांच्या हितासाठी काम केले जावे. मनसेच्या सर्व आंदोलनाची पुस्तिका लवकरच येणार अशी माहीती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (दि. २७) झालेल्या सभेत दिली. महापुरुषांचा अपमान होईल अशी विधाने थांबावा, असे आवाहन त्यांनी भाजप आणि काँग्रेसला केले.

गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित सभेत बोलताना राज ठाकरे म्‍हणाले, " महाराष्ट्रात रेल्वे भरतीसाठी सर्वाधिक बिहारीच आले. हिंदी प्रसारमाध्यमांनी मनसेविरोधात रान पेटवलं. मनसेने घेतलेली भूमिका महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगारासाठी, संरक्षणासाठी होती. ही भूमिका समजून घेणे महत्त्वाचे आहे. स्वतंत्र महाराष्ट्राची हाक देणारी ही आंदोलने नव्हती. मनसेची आंदोलने ही देश फोडण्यासाठी नव्हती. रझा अकादमीविरोधात आंदोलन केले आहेत."

एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली

माजी मुख्यमंत्र्यांनी तब्येतीचे कारण सांगून काहीच केली नाही. घरातून बाहेर न पडता केलेले काम त्यांना चांगलेच महागात पडले. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली, त्यावेळी यांना जाग आली. उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का? असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्‍यावर जोरदार टीका केली.

बाळासाहेबांची इच्छा मनसेने पूर्ण केली

मनसेने मशिदीवरील भोंगे उतरवले. सर्व आंदोलने मनसेने यशस्वी केली आहेत. बाळासाहेबांची इच्छा मनसेने पूर्ण केली आहे. अजूनही जर कोणत्याही मशिदीवरील भोंगे उतरवले नसतील तर त्याविरोधात आवाज उठवा. पोलिसांत तक्रार द्या.  मनसेची भूमिका ही लोकांना त्रास होणार नाही. या सर्व गोष्टी लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. मनसेचे या सगळ्या आंदोलनांचे पुस्तक लवकरच येणार आहे,  असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

उद्योग धंद्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नाही. परप्रातीयांना विचारा ते महाराष्ट्रात का आले? त्यामुळे महाराष्ट्र काय आहे हे आम्‍हाला कोश्यारी यांच्याकडून ऐकायचे नाही. असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.

महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलं आहे का?

 राज्यातला एक मंत्री महिलेला शिव्या देतो. इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राचे राजकारण गेलं आहे का? या सगळ्याचे एकमेव कारण आहे की, सभोवतालचे वातावरण. जे जातीपातीचे राजकारण सुरु आहे. त्याचाच हा परिणाम आहे. म्हणूनच सध्याचे तरुण नोकऱ्या सोडून बाहेर जात आहेत. असा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पहायचा का ? असा सवालही त्‍यांनी केला.

राहुल गांधी बोलतात की आरडी बर्मन

सध्या राहुल गांधी बोलतात की आरडी बर्मन बोलतात तेच समजत नाही. त्‍यांचे सावरकरांवरील विधान कितपत योग्य आहे. दयेचा अर्ज ही सावरकरांची रणनीती होती. त्यामुळे ही रणनीती ते समजून घेत नाहीत, म्हणूनच त्यांचा मेदू गुळगुळीत आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

सध्याच्या फोटोंवरुन देखील मोठे राजकारण चालू आहे. नेहरुंचा एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल होत होता. त्याच्यावरुन उलटसुलट चर्चा होत्या. हे असलं राजकारण थांबवा. महापुरुषांचा अपमान करणे काँग्रेस, भाजपने थांबवावं असं आवाहन राज ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news