केजरीवालांच्या निकटवर्तीयाकडूनच सत्येंद्र जैन यांचे व्हिडीओ लीक : भाजपचा दावा | पुढारी

केजरीवालांच्या निकटवर्तीयाकडूनच सत्येंद्र जैन यांचे व्हिडीओ लीक : भाजपचा दावा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे लोकच तिहार तुरुंगात बंद असलेल्या ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांचे व्हिडिओ ‘लीक’ करत आहेत, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आज (दि.२७) पत्रकारांशी बोलताना केला.

बलात्काराच्या प्रकरणातील दोषीकडून सत्येंद्र जैन यांचा मसाज केला जात असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतरही जैन यांची तुरुंगात सर्व प्रकारची बडदास्त ठेवली जात असल्याबद्दलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ आणि जैन यांच्याबाबतची माहिती केजरीवाल यांचे निकटवर्तीयच लीक करीत असल्याचे पात्रा यांनी नमूद केले.

हवाला प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर जैन यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मेपासून ते तिहार तुरुंगात आहेत.

हेही वाचा : 

Back to top button