

Stock Market Updates : सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली होती. पण दुपारनंतर दोन्ही निर्देशांकांनी तेजी गमावली. २०२२ च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्स, निफ्टी घसरून बंद झाले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी वाढला होता. तर निफ्टीने १८,२५० वर व्यवहार केला होता. त्यानंतर सेन्सेक्स २९३ अंकांच्या घसरणीसह ६०,८४० वर बंद झाला. तर निफ्टी ८५ अंकांनी घसरून १८,१०५ वर स्थिरावला. ICICI बँक, Zomato शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले.
आजच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये तेजी राहिली. यामुळे निफ्टी आयटी इंडेक्स १ टक्क्याने मजबूत झाला. पीएसयू बँक, मेटल आणि रियल्टी इंडेक्समध्ये सुमारे १ टक्के तेजी होती. बँक, फायनान्सियल, फार्मा, ऑटोसह अन्य इंडेक्सदेखील हिरव्या रंगात राहिले. आजच्या व्यवहारात हेविवेट शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्सवरील ३० पैकी १७ शेअर्समध्ये तेजी होती.
आज IT शेअर्समध्ये तेजी दिसून आली. टेक महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फायनान्स, विप्रो, बजाज फिनसर्व्ह हे टॉप गेनर्स होते. या शेअर्समध्ये ०.५ ते १ टक्क्यापर्यंत वाढ दिसून आली. टाटा मोटर्स, इन्फोसिस, एसबीआय, एचसीएल टेक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्सदेखील वधारले आहेत. तर एम अँड एम, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, आयटीसी, इंडसइंड बँक आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स घसरले.
गेल्या वर्षभरात झोमॅटो, One97 कम्युनिकेशन्स, एफएसएन ई- कॉमर्स, पीबी फिनटेक, डेलिव्हरी यांचे स्टॉक्स ३९ ते ६० टक्क्यांपर्यत घसरले. यामुळे गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका बसला आहे. या कंपन्यांच्या आयपीओ खरेदीदरम्यान गुंतवणूकदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला होता.
अमेरिकेतील मुख्य निर्देशांक गुरुवारी वाढले होते. अमेरिकेतील बेरोजगारीच्या आकडेवारीने फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत ज्यामुळे महागाईशी लढा देण्यासाठी श्रमिक बाजाराची ताकद कमी होऊ शकते. गुरुवारी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज निर्देशांत १.०५ टक्क्याने, एस अँड पी १.७५ टक्क्याने आणि नॅस्डॅक कंपोझिट २.५९ टक्क्यांनी वाढला होता.
अमेरिकेच्या शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत आज बहुतांश आशियाई बाजारात संमिश्र वातावरण राहिले. शुक्रवारी जपानच्या निक्केई निर्देशांकाने सुरुवातीला तेजीत सुरुवात केली होती. पण तो स्थिर पातळीवर बंद झाला. सुरुवातीच्या ०.९ टक्के वाढीनंतर निक्की निर्देशांक २६,०९४.५० वर बंद झाला. वर्षभरातील या निर्देशांकांची घसरण ९.४ टक्के एवढी आहे. २०१८ नंतर पहिल्यांदाच याला फटका बसला आहे. तर टॉपिक्स ०.१९ टक्क्याने कमी होऊन १,८९१ वर बंद झाला. (Stock Market Updates)
हे ही वाचा :