

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी सावध सुरुवात केली. पण मिड आणि स्मॉलकॅप्समध्ये खरेदी दिसून आली. सुरुवातीला सेन्सेक्स १५० अंकांच्या वाढीसह ६५,६०५ वर तर निफ्टी १९,४३० वर होता. आयटी आणि मेटल शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे. (Stock Market Updates)
काल सेन्सेक्स ६५,४४६ वर बंद झाला होता. तो आज ६५,३९१ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ६५,५०० वर गेला. सेन्सेक्सवर रिलायन्स, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, अॅक्सिस बँक, सन फार्मा, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स वाढले आहेत. तर इंडसइंड बँक, टाटा स्टील, एचसीएल टेक, एचडीएफसी, मारुती, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले आहेत.
निफ्टीवर ब्रिटानिया, एसबीआय लाईफ आणि पॉवर ग्रिड हे टॉप गेनर्स आहेत. हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर आयशर मोटर्स घसरला आहे. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी मीडिया आणि निफ्टी रियल्टी प्रत्येकी १ टक्क्यांनी वधारले आहेत.
अमेरिकेतील शेअर बाजार बुधवारी घसरण झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अतिरिक्त व्याजदरवाढीचे संकेत दिल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) १२९ अंकांनी घसरून ३४,२८८ वर बंद झाला. एस अँड पी निर्देशांक देखील घसरला आहे. तर नॅस्डॅक कंपोझिट २५ अंकांनी घसरून १३,७९१ वर आला. आशियाई बाजारातही कमकुवत स्थिती आहे. MSCI च्या आशिया-पॅसिफिक शेअर्सच्या विस्तृत निर्देशांकात ०.७ टक्के घसरण झाली. जपानचा निक्केई (Japan's Nikkei) १ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग (Hong Kong's Hang Seng) आणि तैवानमधील निर्देशांकही घसरला आहे. (Stock Market Updates)
हे ही वाचा :