

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज शुक्रवारी सुरुवातीला खरेदी दिसून आली. यामुळे सेन्सेक्स ८० अंकांच्या वाढीसह खुला झाला होता. पण काही क्षणातच ही तेजी नाहीसी झाली. सकाळी १०.१५ च्या सुमारास सेन्सेक्स १३० अंकांनी घसरून ६०,५०० वर होता. तर निफ्टी १७,९०० च्या खाली आला होता. (Stock Market Opening)
अमेरिकेतील संमिश्र मॅक्रो इकॉनॉमिक्स डेटा तसेच बँकिंग आणि फायनान्सियल स्टॉक्समधील तोटा यामुळे भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेजी गमावली.
सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, HUL, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक आणि एचसीएल टेक हे शेअर्स घसरले. तर विप्रो, सन फार्मा, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि एल अँड टी हे वधारले आहेत. ग्राहकोपयोगी वस्तूंचा उद्योग व्यवसाय रेमंड कंझ्युमर केअर ३४५ दशलक्षमध्ये खरेदी करणार असल्याची माहिती एक्सचेंजेस दिल्यानंतर गोदरेज कंझ्युमरचे शेअर्स ३.५ टक्क्यांनी कमी झाले. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात रेमंडचे शेअर्स सुमारे ५ टक्के घसरले होते.
क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी फायनान्सियल ०.४२ टक्के खाली आला होता. निफ्टी बँकही घसरला आहे. तर ऑटो, आयटी मीडिया, फार्मा आणि हेल्थकेअर स्टॉक्स वाढले आहेत.
हे ही वाचा :