मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी ‘हे’ शेअर एक चांगली गुंतवणूक ठरेल | पुढारी

मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी 'हे' शेअर एक चांगली गुंतवणूक ठरेल

  • भरत साळोखे,
    संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

मागील सप्ताहात बाजारात जी तेजीची चाहूल लागलेली होती. या नजीकच्या गत सप्ताहात अगदी पूर्णपणे गायब झालेली नसली तरी थोडी धूसर झाल्याचे दिसून आले. प्रमुख निर्देशांकाची कामगिरी पहा.

सेन्सेक्स – 59655.06 उणे 1.24 टक्के
निफ्टी 59 – 17624.05 उणे 1.14 टक्के
निफ्टी मिडकॅप – 31087.35 अधिक 0.67 टक्के
निफ्टी स्मॉलकॅप – 9369.40 अधिक 0.33 टक्के
निफ्टी बँक – 42118.00 उणे 0.03 टक्के

आर्थिक आघाडीवर हा आठवडा असा फ्लूट तर होताच. शिवाय त्यामध्ये ना कोणती खळबळ होती ना कोणती प्रमुख बातमी होती. असे कंटाळवाणे कालावधी मधूनमधून बाजारातच काय, माणसाच्या आयुष्यातही येतच असतात.

सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण ही प्रामुख्याने आयटी इंडेक्समुळे घडून आली. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्र या प्रमुख पाच भारतीय आयटी कंपन्यांजवळ निफ्टीचा भाग आहेत आणि इंडेक्समध्ये त्यांचे Weightage आहे. जवळपास पंधरा टक्के गेल्या आठवड्यात निफ्टी आयटी इंडेक्स पावणे पाच टक्क्यांनी घसरला. 1990 च्या दशकातील आयटी कंपन्यांची धूम आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व क्षेत्रे डबघाईला आली असताना आयटी कंपन्यांनी मारलेली भरारी या दोन गोष्टी लक्षात घेतल्यास, सध्याची या क्षेत्रामधील धूसरता गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी आहे. या क्षेत्रातील भारतातील जायंटी, इन्फोसिस जर केवळ सात टक्के Revenue Growth दाखवत असेल, तर इतर कंपन्यांचे काय? यूएसमधील जून 2022 मध्ये 9.5 टक्के असणारा महागाई दर पाच टक्क्यांवर आला तरी फंड रिझर्व्ह व्याजदर वाढ करणे थांबवत नाही. त्यामुळे यूएस आणि युरोपमधील आर्थिक मंदीची चिंता भारतातील आयटी सेक्टरला झाकोळून टाकत आहे.

नेस्ले इंडियाच्या शेअर मागील आठवड्याचा स्टार परफॉर्मर ठरला. पाच टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवून तो आज 20515.00 वर ट्रेड करत आहे.

नेस्लेच्या बरोबरीनेच आयटीसीची चर्चा आज इथे करायला हवी. FMCG सेक्टरमधील हा भारतीय हत्ती जागा होऊन दमदारपणे वाटचाल करू लागला आहे. गेल्या एक वर्षात त्याने पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. गत सप्ताहात आयटीसीने दोन आघाड्यांवर नेत्रदीपक कामगिरी केली. पहिली म्हणजे या शेअरने 430 रु.चा टप्पा पार केला. (CMP 408 Rs.) दुसरी गोष्ट म्हणजे बाजार भांडवलाच्या बाबतीत (Market Cap) आयटीसीने 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करत सातव्या क्रमांकावर स्थान पटकावले. एचडीएफसीला मागे टाकून Market Cap च्या बाबतीत आता त्याची इन्फोसिसशी स्पर्धा सुरू होईल. 1910 साली सिगारेट उत्पादक कंपनी म्हणून सुरू झालेली ही कंपनी आज FMCG, Agri, Hotels, Paper, Stationary ProductsFMCG, Agri, Hotels, Paper, Stationary Products क्षेत्रांतील अत्यंत प्रथितयश कंपनी आहे.

एकूणच गतसप्ताह हा रेंगाळत गेला असल्यामुळे स्टॉकस लेव्हललादेखील काही फार मोठ्या हालचाली झाल्या नाहीत. इंडेक्समधील केवळ कोटक महिंद्र बँक, स्टेट बँक, एशियन पेंटस, आयटीसी आणि नेस्ले इंडिया या पाचच कंपन्यांचे शेअर्स 1 टक्क्यांहून अधिक वाढले.

बँक निफ्टी गेल्या आठवड्यात पूर्णपणे निद्रिस्त होता, असे म्हटले तरी वागवे होणार नाही. आता या आठवड्यातील आयसीआयसीआय बँकेच्या निकालांवर त्याच्यात काही खळबळ माजली तरच जोडीला अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक यांचेही निकाल आहेत. बजाज फायनान्स, एचडीएफसी, एएमसी, एयू बँक, कॅनलीन होम्स ही फायनान्शियल सेक्टरमधील दमदार नावेही आपले निकाल जाहीर करतील.

मिंडा कार्पोरेशन, नवीन फ्लोराईन, चेन्नई पेट्रो, एशियन हॉटेल्स या शेअर्सनी Golden Crossover केलेला आहे. तसेच सिप्ला, गुजरात गॅस, आरसीएफ कोटक, महिंद्र बँक, डॉ. लाल पॅथलॅब्ज या शेअर्सनी Bullish Engulfing सिग्नल दिलेला आहे. या सर्व शेअर्सकडे ट्रेडर्सनी लक्ष द्यावे.

पॅकेजिंग सेक्टरला लागणार्‍या फिल्मसचे उत्पादन करणारी जिंदाल फॅलिफिलम्स ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. 1164 रु. वर्षभरातील उच्चांकी भाव असणार्‍या या शेअरची आजची किंमत आहे. 584.15 (BSG) केवळ 2.53 P.E. असणार्‍या या शेअरची बूक व्हॅल्यू आहे. 1240.00 गेल्या एक वर्षात जवळपास 50 टक्के हा शेअर घसरलेला आहे. गेल्या तीन वर्षांपासून कंपनीची विक्री आणि नफा वाढत आहे. गेल्या एक महिन्यात हा शेअर जवळपास 7 टक्के वाढला आहे. मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी हे शेअर एक चांगली गुंतवणूक ठरेल.

Back to top button