Stock Market Crash | सेन्सेक्स ६१० अंकांनी कोसळला, ‘या’ क्षेत्रांत विक्रीचा मारा, जाणून घ्या आजचे मार्केट

Stock Market Crash | सेन्सेक्स ६१० अंकांनी कोसळला, ‘या’ क्षेत्रांत विक्रीचा मारा, जाणून घ्या आजचे मार्केट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेत, परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि कच्च्या तेलाच्या दरातील वाढीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शेअर बाजार गडगडला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ६२० अंकांनी म्हणजेच ०.९४ टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी १९,५५० च्या खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स ६१० अंकांच्या घसरणीसह ६५,५०८ वर बंद झाला. तर निफ्टी १९२ अंकांनी घसरून १९,५२३ वर स्थिरावला. निफ्टीची आज घसरण ०.९८ टक्के एवढी आहे. आज आयटी, एफएमसीजी स्टॉक्सना मोठा फटका बसला. (Stock Market Crash) आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १.८२ लाख कोटींनी कमी होऊन ३१७.७९ लाख कोटींवर आले.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, एशियन पेंट्स आणि एम अँड एम हे टॉप लूजर्स ठरले. हे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. आयटीसी, टायटन, विप्रो, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि इन्फोसिस देखील घसरले. तर एलटी भारती एअरटेल, पॉवर ग्रिड हे शेअर्स वाढले. (Stock Market Crash)

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने ऑइल इंडियाचे शेअर्स ६ टक्क्यांनी वाढले. तर विमा कंपनी ICICI लोम्बार्डला GST विभागाकडून कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर त्यांचे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, स्मॉल-कॅप्स आणि मिड-कॅप्सही घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी आयटी १.७ टक्क्यांनी घसरला. टेक महिंद्रा, एलटीटीएस आणि पर्सिस्टंटमधील घसरणीमुळे आयटी निर्देशांक खाली आला.

बाजारातील घसरणीचे कारणे

  • यूएस बाँड उत्पन्नात वाढ
  • डॉलर निर्देशांत तेजी
  • कच्च्या तेलाचे वाढलेले दर
  • जागतिक बाजारात कमकुवत स्थिती
  • देशांतर्गंत बाजारात हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार विक्री

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news