Stock Market Closing | सेन्सेक्स ६१ हजार पार, निफ्टी ४४ दिवसांनंतर १८ हजारांवर, ‘हे’ स्टॉक्स तेजीत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज तेजी राहिली. सुरुवातीला बाजारात चढ-उतार दिसून आला. पण त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत व्यवहार केला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने सुमारे ५५० अंकांनी वाढून व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ४६३ अंकांच्या वाढीसह ६१,११२ वर बंद झाला. तर निफ्टी १३७ अंकांनी वाढून १८,०५२ वर स्थिरावला. विशेष म्हणजे आज निफ्टीने ४४ दिवसांनंतर १८ हजारांवर झेप घेतली. (Stock Market Closing)

बाजारात सुरुवातीला खरेदी दिसून आली. यामुळे सेन्सेक्स ८० अंकांच्या वाढीसह खुला झाला होता. त्यानंतर सकाळी १०.१५ च्या सुमारास सेन्सेक्स १३० अंकांनी घसरून ६०,५०० वर आला. तर निफ्टी १७,९०० च्या खाली आला होता. (Stock Market Opening) त्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी वधारले. आजच्या ट्रेडिंग सत्रात बाजारात ऑटो, आयटी आणि PSU बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी राहिली. निफ्टीवर विप्रोचा शेअर सुमारे २ टक्क्यांहून अधिक वाढून टॉप गेनर होता. तर ॲक्सिस बँकेचा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरून टॉप लूजर ठरला. Zomato चा शेअर ४ टक्क्यांनी वाढला.

'हे' होते टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर नेस्ले इंडिया, विप्रो, एलटी, SBI, आयटीसी, टेक महिंद्रा, रिलायन्स, भारतीय एअरटेल, कोटक महिंद्रा, बजाज फायनान्स, टीसीएस हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर ॲक्सिस बँक, एचसीएल टेक, टायटन, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले होते.

अदानी एंटरप्रायजेस, विप्रो शेअर्स तेजीत

NIFTY ५० वर अदानी एंटरप्रायजेस (४ टक्के वाढ), विप्रो (२.९१ टक्के वाढ), अदानी पोर्ट्स (२.१४ टक्के वाढ), ब्रिटानिया (१.८८ टक्के वाढ), लार्सेन (१.८२ टक्के वाढ), टेक महिंद्रा (१.५८ टक्के वाढ), नेस्ले (१.५७ टक्के वाढ), अपोलो हॉस्पिटल (१.५४ टक्के वाढ), एचडीएफसी बँक (१.४९ टक्के वाढ), रिलायन्स (१.४९ टक्के वाढ), सन फार्मा (१.२२ टक्के वाढ), हिरो मोटोकॉर्प (१ टक्के वाढ) हे शेअर्स वाढले होते. तर अॅक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, टायटन हे शेअर्स घसरले होते.

PSU बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी, UCO Bank टॉप गेनर

PSU बँकिंग शेअर्समध्ये युको बँकेचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक वाढला. इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया हे शेअर्स सुमारे ३ टक्क्यांनी वाढले. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक हे शेअर्सदेखील वधारले होते.

बाजारात जोरदार रिकव्हरी

जागतिक संकेत सकारात्मक असतानाही सुरुवातीला बाजारात चढ-उतार दिसून आला होता. अमेरिकेतील संमिश्र मॅक्रो इकॉनॉमिक्स डेटा तसेच फायनान्सियल स्टॉक्समधील तोटा यामुळे भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेजी गमावली होती. पण त्यानंतर बाजारात रिकव्हरी दिसून आली. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news